राज्यस्तरीय कोरियन कराटे स्पर्धेत भोकरच्या मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालयाची चमकदार कामगिरी
(प्रतिनिधी-परशुराम सूर्यवंशी)
ठाणे येथे संपन्न झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय तेंग-सु-डो कोरियन कराटे स्पर्धेत मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय, भोकरच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात श्रद्धा साहेबराव गोरठकर हिने सुवर्णपदक तर तेजस्विनी भाऊसाहेब राठोड हिने कांस्यपदक पटकावले. विद्यार्थिनींच्या मेहनतीला मुख्य कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांचे योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, सचिव नारायणराव कुंडगुलवार, मुख्याध्यापिका सौ. सविता मांजरेकर, क्रीडा शिक्षक विठ्ठल कुमरे आणि प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे भोकर शहराचे नाव उज्ज्वल झाले आहे.

No comments:
Post a Comment