विठ्ठल नामाची शाळा भरली.
प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे लोणी गवळी.
मेहकर : स्थानिक संताजी कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बाल वारीचा भक्तिमय अनुभव देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. टाळ, मृदंग आणि आकर्षक पालखीच्या सजावटीसह आयोजित या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा पालखीत विराजमान करण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. विद्यार्थी कार्यक्रमादरम्यान आणि शिक्षकांनी फुगडी खेळत व अभंग-भजनाच्या गजरात वारीचा आनंद लुटला. लिपिक विजय देवडे व पालक कलाशिक्षक रामेश्वर तोंडे यांनी नृत्य व फुगडी सादर करून भक्तीमय वातावरण निर्माण झाले. विदया गोपाल पाखरे, सोनुने काकू, नालिंदे आजी व इतर पालक वर्ग व संचालक मंडळ अभंगांनी उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. विशेष संताजी कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवली वारीची भक्तिमय परंपरा तिच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. यावेळी अध्यक्ष सतीषजी गायकवाड, अनिलजी व-हाडे,अँड. गोपालजी पाखरे, गजाननजी मिसाळ, गजाननजी वनस्कर प्राचार्या मनिषा राजबिंडे मॅडम, विशालजी डोंगरे सर, बनकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारीची परंपरा, संतांचे कार्य आणि संतवाङ्मयातील जीवनमूल्ये याविषयी मार्गदर्शन केले. विठ्ठल नामस्मरणाचे महत्त्व आणि नामभक्तीचे अध्यात्मिक मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या दिंडीची स्वगत व समारोप सतिषजी व-हाडे, भारतीताई व-हाडे,जयाताई व-हाडे व व-हाडे परिवार यांच्या विठ्ठलरुक्मिणी मंदिरात महाआरती व लाडू महाप्रसाद देवून केले.

No comments:
Post a Comment