जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस निमित्ताने विदयार्थ्यांना मार्गदर्शन.
मूर्तिजापूर प्रतिनिधी गजानन चव्हाण
पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर अंतर्गत दिनांक 26.06.26 रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस निमित्ताने मिशन उडान अंतर्गत जनजागृती करिता मूर्तिजापूर शहरातील प्रसिद्ध जि. के अकॅडमी कोचिंग क्लासेस तिडके नगर मुर्तीजापुर येथे अमली पदार्थ विरुद्ध दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजू वानखडे यांनी सर्वांना अमली पदार्थाच्या सेवन मुळे होणाऱ्या दुष्परिणाम बाबत अवगत करण्यात आले, अमली पदार्थाचे सेवन करू नका आणि करू देऊ नका याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात केले . तसेच खुपिया विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल साहिल मुल्लानी व महिला पोलीस कॉन्स्टेबल उजमा यांनी डायल 112, सायबर, दामिनी मार्शल याबाबत अधिक माहिती देली, तसेच बंदोबस्तावर असलेले होमगार्ड चे कपंनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी जि.के अकॅडमीचे संचालक रवी गोंडकर यांनी सर्वांचे स्वागत करीत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि के अकॅडमीचे संचालक प्रा. गजानन वरघट यांनी केले या कार्यक्रमासाठी क्लासेस चे 20 ते 30 विद्यार्थी हजर होते, तसेच बस स्टॅन्ड मुर्तीजापुर येथे लोकांना जागतिक अमली पदार्थ विरोध दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले यावेळी 40 ते 50 लोकांचा जमाव होता .

No comments:
Post a Comment