नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी
उत्तूर : नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , उत्तूर येथे दिनांक 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यश्वी रावसो भागवत (आंतरराष्ट्रीय योगपटू)उपस्थित होत्या. प्राची येजरे, हिमानी रेडेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी योगामुळे शरीर व मन निरोगी राहते, एकाग्रता वाढते तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो, याबाबत मार्गदर्शन केले. योगपटू यश्वी भागवत यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले.
या वेळी सुमारे 2६४ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात विविध योगासनांचा सराव केला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत योग दिनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.कार्यक्रमास प्राचार्य रामकृष्ण मगदूम, संचालक विजय सावेकर, क्रिडाविभाग प्रमुख विशाल वडवळे, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून नव कृष्णा व्हॅली स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. योगाची प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थी

No comments:
Post a Comment