श्री अंबाबाई (महालक्ष्मी) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे ₹१,५०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या हस्ते संपन्न



 आज कोल्हापूरच्या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे ₹१,५०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या हस्ते संपन्न झाले. 

करवीर क्षेत्राच्या धार्मिक वैभवाला साजेशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होणार असून भाविकांना अधिक दर्जेदार,आधुनिक आणि सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध होतील. तसेच कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवी उभारी मिळणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण होऊन कोल्हापूरच्या प्रगतीला अधिक गती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

याप्रसंगी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी तसेच शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment