क्षितिज ग्रुपकडून पांजरपोळ गोरक्षण संस्थेला मदतीचा हात !



करमाळा प्रतिनिधी :- जितेंद्र चांदगुडे 

स्वनिधीतून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या क्षितिज ग्रुपने यावेळी करमाळा येथील पांजरपोळ गोरक्षण संस्थेला संस्थेतील गायींच्या चारापाण्यासाठी रोख आर्थिक रक्कम देत मदतीचा हात दिला आहे.

      क्षितिज ग्रुपच्या सदस्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड,डॉ. सुनीता दोशी,डॉ. सुजाता मेहता,माधुरी साखरे,माजी मुख्याध्यापिका निलिमा पुंडे, कोर्टीच्या माजी सरपंच नलिनी जाधव, मंजू देवी,सुप्रिया येवले, स्वाती माने ,कावेरी देशमुख आदी सदस्यांनी संस्थेस भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती घेऊन या कार्याची प्रशंसा केली.संस्थेचे अध्यक्ष भरत गांधी,संगीता गांधी, जाकीर पठाण यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती देऊन गोरक्षण व गोपालन याकामी समाजातील दानशूर,मान्यवर मंडळींच्या सक्रिय सहकार्य,सहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.उपस्थितांचे स्वागत व आभारप्रदर्शन मंगेश गांधी यांनी केले.

 

No comments:

Post a Comment