संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार



​बातमी संकलन: प्रतिनिधी, गणेश माळोकर


​संवत्सर: श्री क्षेत्र संवत्सर येथील महानुभाव आश्रमाच्या पवित्र परिसरात, विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार श्री. विवेकभैय्या कोल्हे यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. हा सत्कार आश्रम संचालक राजधर बाबा महानुभाव यांच्या शुभहस्ते आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

​सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणार

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, "संवत्सर येथील महानुभाव आश्रमाची परंपरा आणि इतिहास अत्यंत मोठा आहे. या पवित्र परिसरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच या आध्यात्मिक केंद्राच्या विकासालाही आपण पूर्ण ताकद देऊ."

​मान्यवरांची उपस्थिती आणि जल्लोष

कार्यक्रमाचे प्रमुख राजधर बाबा महानुभाव यांनी विवेकभैय्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विवेकभैय्यांचे आश्रमात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी कोल्हे परिवाराच्या जनसेवेच्या वारशाचे कौतुक केले.

​संवत्सर गावाच्या आणि आश्रमाच्या प्रगतीसाठी विवेकभैय्यांच्या निवडीमुळे नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यासाठी संवत्सरसह पंचक्रोशीतील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


No comments:

Post a Comment