कळमनुरी पथकातील होमगार्ड सुरेश खंडुजी बेद्रे पाटील यांच्या यशस्वी कारकिर्दीचा सेवा निवृत्तीचा सोहळा संपन्न



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी होमगार्ड कार्यालय येथे होमगार्ड सुरेश खंडुजी बेद्रे पाटील यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमा च्या अध्यक्ष म्हणून श्री अशोकराव भोसकर माजी समादेशेक अधिकारी  होमगार्ड कळमनुरी  व माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद कळमनुरी हे होते तसेच या कार्यक्रमा ला प्रमुख मार्गदर्शन श्री विश्वनाथ बेद्रे पाटील यांनी केले या कार्यक्रमा ला प्रमुख उपस्थित श्री विलासराव भोसकर ,गणेशराव भगत ,संतुकराव बेद्रे पाटील ,अरुण पवार, कान्होबा वाढवे, रमेश पवार, गजानन उर्फ अण्णा पाटील ,दिनेश पत्की इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमा चे सूत्र संचालन दिपक पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन अरविंद पाटील अंश कालीन लिपिक होमगार्ड कळमनुरी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश पंडीत मोहम्मद रफीक, बबन शिंदे, राजु इंगळे, अजयसिंह सूर्यवंशी व सर्व होमगार्ड व महिला होमगार्ड यांनी केले सुरेश पाटील यांना पुढील कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या 


No comments:

Post a Comment