अवसायनातील संस्थांचे निकाल लवकर देऊन दूध उत्पादक संस्थांना न्याय द्या!



सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न आणि अवसायनातील सुनावणी पूर्ण झालेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ द्यावा तसेच उर्वरित संस्थांची सुनावणी लवकर पूर्ण करावी आणि दूध उत्पादक संस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी सहाय्यक निबंधक (दुग्ध विभाग) कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. 

असायानात काढलेल्या अनेक दूध संस्था गेली अनेक वर्ष गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. यापूर्वीही गोकुळच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी पुर्ण करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चूयेकर, डॉ. चेतन नरके, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील,आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment