भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
कोल्हापूर : 17 ( प्रतिनिधी )
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाले आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ अपघात झालासमृद्धी महामार्गावर भीषण अपघात शेळके यांच्या कारने पाठीमागून धडक दिलीखरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके उपाध्यक्ष होते.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार महामार्गावर उभ्या कंटेनरला जितेंद्र शेळके यांच्या कारने पाठीमागून धडक दिली. कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघातात जितेंद्र शेळकेंचा जागीच मृत्यू तर पत्नी आणी मुलगा गंभीर जखमी झाले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नी अजूनही गाडीत अडकलेली आहे.खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके उपाध्यक्ष राहिले होते.शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागिदारी होती. जेंव्हापासून खरातला अटक झाले आहे त्या दिवसापासून जितेंद्र शेळके तणावात होते असे बोलेले जात आहे.

No comments:
Post a Comment