चास नळी येथे नेत्र शिबिर संपन्न.


पत्रकार:- मोहन जाधव.


चास नळी:-   महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चासनळी येथे नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांचे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम आधार फाउंडेशन व माय भूमी सोशल फाउंडेशन चास नळी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धामोरी येथील रहिवासी व सध्या पुण्यात यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेले विनोद अहिरे उपस्थित होते. नुकतीच त्यांनी आपल्या जन्मभूमीस एक सुसज्ज रुग्णवाहिका अर्पण केली असून तिचा लाभ चासनळी व धामोरी परिसरातील गरजू रुग्णांना होणार आहे. याप्रसंगी त्यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अपघातग्रस्त, पाय किंवा मनक्याला फ्रॅक्चर झालेल्या गरजू रुग्णांसाठी वॉकर तसेच बेडरेस्टसाठी लागणारे बेड मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास सोमनाथ चांदगुडे, दिलीप चांदगुडे, कमलाकर चांदगुडे,सरपंच सुनीताताई बनसोडे, उपसरपंच विनायक गाडे, कैलास माळी, बापू कासोदे, रत्नाकर धेनक, गोरख धेनक, ज्ञानेश्वर धेनक, डॉ. बर्डे, पोलीस पाटील प्रकाश शिंदे, भागिनाथ धेनक, सोपान धेनक, नानासाहेब बनसोडे, ग्रामसेवक गायकवाड, अनिल धेनक, कैलास चांदगुडे, संजय शिंदे, कैलास धेनक, संचालक मनीष गाडे संचालक सचिन चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे चासनळी व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेचा मोठा लाभ मिळाला असून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

No comments:

Post a Comment