३७ वर्षांची निष्कलंक सेवा : पीएसआय विजय पाटील यांचा आदर्श प्रवास, सेवानिवृत्तीनंतर सदिच्छा भेट
१२६ बक्षिसे, एकही शिक्षा नाही; प्रामाणिक सेवेमुळे समाजात विशेष आदर
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
अजिंठा : अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत राहिलेले पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) विजय पाटील यांनी तब्बल ३७ वर्षे २ महिने पोलीस खात्यात प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावत अलीकडेच सेवानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या नवीन निवासस्थानी भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सेवेच्या काळात विजय पाटील यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचा आदर्श ठेवत काम केले. त्यांच्या सेवाकाळात त्यांना तब्बल १२६ बक्षिसे मिळाली असून एकही शिक्षा न मिळता त्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली. समाजात पोलीस खात्याबद्दल वेगवेगळे समज असताना पाटील यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून वेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीदरम्यान पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत जीवनात प्रामाणिकपणे आणि मूल्याधिष्ठित मार्गाने कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी दैनिक सामना चे पत्रकार व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख, किसान करनी सेना महाराष्ट्र प्रदेश महासचिव इकबाल कासम तडवी, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष रवींद्र बागुलकर, दिलीप तडवी, मेजर तायडे (होमगार्ड) तसेच अजिंठा पोलीस मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय गुंजन पाटील, प्राची पाटील व परिवारातील सदस्यही या प्रसंगी उपस्थित होते.
उपस्थितांनी विजय पाटील यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:
Post a Comment