शाळेतून लांबवले तीन गॅस सिलेंडर



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी (जि. हिंगोली) : सध्या व्यावसायिक व घरगुती गॅस वितरणाचा मुद्दा चर्चेत असताना जिल्हा परिषदेच्या सुकळी वीर (ता. कळमनुरी) येथील शाळेमधून चोरट्यांनी तीन गॅस सिलिंडर पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. सुकळी वीर येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा आहे. शाळेमध्ये १४६ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आहार शिजवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. 

शाळेत भारत गॅसचे दोन व इंडियन ऑइल कंपनीचा एक सिलिंडर आहे. मंगळवार (ता. १०) मध्यान्न भोजन वाटप झाल्यानंतर शाळेच्या किचन शेडला कुलूप लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कुलूप तुटलेले दिसले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी पाहणी केली असता किचन शेड मधील तीन सिलेंडर लंपास झाल्याचे दिसून आले मुख्यध्यापक यांनी या बाबत तक्रार दिली आहे  एन.सी. मेंढके यांनी तक्रार दिली आहे.


No comments:

Post a Comment