अनसिंग गावातील जल जीवन मिशनमध्ये गैरव्यवहारात



८ कोटी ७३.७४ लाखांचा निधी खर्चूनही योजना अपूर्ण; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे निष्काळजीपणा.! सामाजिक कार्यकर्ते यश चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी...


अनसिंग:-( नारायण सातव) 

अनसिंग,जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अनसिंग गावातील पाणीपुरवठा योजनेतील गंभीर अनियमितता, प्रचंड विलंब आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात युवा सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी आज (ता.२४ )मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे

अनसिंग गावासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही पाणीपुरवठा योजना सन २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. करारानुसार ही योजना सन २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२५ संपूण२०२६मार्च संपत आले असतानाही ही योजना अपूर्णच आहे. यामुळे गावातील सुमारे १५ हजारांहून अधिक नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांचे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक मोठे नुकसान होत आहे.यापूर्वीही या प्रश्नावर अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला होता. (ता. १० )जानेवारी २०२५ रोजी आंदोलनानंतर उपविभागीय अभियंत्यांनी (ता.३१ ) मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम यांनी (ता.२६ ) डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे (ता.७ ) फेब्रुवारी २०२६ पर्यंत वार्डनिहाय पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. 

यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात आली आहे.या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल ८. कोटी ७३.७४ लक्ष रुपयांचा निधी कंत्राटदाराला अदा करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष काम ६० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहार, संगनमत आणि शासकीय निधीच्या अपहार केला आहे यासोबतच, योजना पूर्ण होण्यापूर्वीच संपूर्ण गावात टाकण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर लिकेज आढळून आले आहे. यावरून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत असून, ही योजना भविष्यात पूर्णपणे अपयशी ठरण्याचे दिसून येते आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण योजनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करणे, जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करणे, कंत्राटदाराचा करार रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकणे, तसेच निकृष्ट कामासाठी अदा केलेला निधी वसूल करणे यांचा समावेश आहे. तसेच, खराब झालेली पाइपलाईन बदलून दर्जेदार काम करून निश्चित कालमर्यादेत नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल,असे निवेदनात यश चव्हाण यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते,याकडे अनसिंगकरांचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment