जलद कालव्यात पडून कामगार व्यक्तीचा मृत्यू
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात जलद कालव्यात पडल्याने द्राक्षे बागेच्या कामासाठी आलेल्या एक कामगार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवगाव येथील पोलिस पाटील सुनिल बोचरे यांनी समक्ष खबर दिली की, सोमनाथ लक्ष्मण बोके, वय ५१, रा.अंबापूर ता.पेठ हे दि.२१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी अंदाजे ६.३० वाजेच्या सुमारास गोदावरी जलद कालव्यात पडल्याने बेपत्ता झाले होते. त्यानंतर दि.२३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह पाटाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अ.मृ. रजिस्टर नंबर २२/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर पुढील तपास करीत आहेत.

No comments:
Post a Comment