करमाळा शहरांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळूची रॉयल्टी द्यावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन
करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे
करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर ९० घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देऊन त्यांना रॉयल्टी पास तात्काळ द्यावे अन्यथा रिपाई (आठवले) गटाच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदनपत्र तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, करमाळा शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुमारे ९० घरकुल मंजूर झालेले आहेत. या घरकुलाचे बांधकाम सुरु करण्यासाठी लाभार्थ्यांना बांधकाम साहित्याची विशेषतः वाळूची मोठ्या प्रमाणात गरज भासते. परंतु सध्या वाळूचे दर अत्यंत जास्त असल्यामुळे गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करणे कठीण झालेले आहे.
घरकुल योजना ही गरीब व वंचित घटकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने सुरु केलेली महत्वाची योजना आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानसार किंवा स्थानिक प्रशासनामार्फत प्रत्येकी किमान ५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरुन त्यांना घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण करता येईल.
शासनाने ही सुविधा रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना इ. योजने करिता लागू केली आहे. या सर्व योजनामध्ये घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ५ ब्रास पर्यंत वाळू देण्याची तरतूद केलेली आहे. वाळू वितरणाची जबाबदारी स्थानिक पातळीवर तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे अधिकारी लाभार्थ्यांना यादी पाहून वाळूचा पास देऊ शकतात. तरी करमाळा शहरातील घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व ९० लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात येऊन तात्काळ रॉयल्टी पास देण्यात यावा. अन्यथा रिपाई (आठवले) गटाच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment