करमाळा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार:- आण्णासाहेब सुपनवर
करमाळा प्रतिनिधी:- जितेंद्र चांदगुडे
करमाळा तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत कृषी पंपांना विज देण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपाची दिवसा लाईट दिली जाईल असे परिपत्रक काढले होते. परंतु करमाळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मनमानीकरुन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत या वेळेत लाईट देत आहेत. परंतु शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबत असुन रात्री लाईट आल्यानंतर रात्रभर पिकांना उभा राहून पाणी द्यावा लागत आहे. रात्रीच्या वेळी हिंसप्राणी सर्पदंश विंचू विजेचा अपघात होऊन अनेक शेतकरी गत प्राण झालेले आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी त्यांनीही काम करून दाखवावे अशी शेतकऱ्यांतून संतापाची लाट तयार झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने 31- 12 -2025 रोजी परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी असा जीआर काढला आहे. परंतु ह्या मनमानी करणाऱ्या कलावते नामक अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ खेळण्याचे व मुख्यमंत्र्यांच्या जीआर ला केराची टोपली दाखवली आहे. जर करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपाची लाईट दिवसात न दिल्यास भाजप किसान मोर्चाच्या वतीने करमाळा महावितरण कंपनीचे ऑफिस समोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment