आयडीयल इंग्लिश स्कूल, एस.एच.के. इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ उत्साहात
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड : येथील आयडीयल इंग्लिश स्कूल, एस.एच.के. इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भावपूर्ण व संस्मरणीय निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मान्यवर वजीरभाई कोंडीवकर, सचिव आसफ पल्लवकर, फरहा कोंडीवकर, शाळेचे प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी, मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षिका सीमा देशमुख, मंजुषा पवार व अमिता मुजुमले यांनी विद्यार्थ्यांबरोबरच्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शनपर विचार मांडले. संस्थेचे सचिव असफ पल्लवकर यांनी विद्यार्थ्यांना उर्वरित दिवसात काटेकोर अभ्यासाचे नियोजन करून बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वास, शिस्त व निर्धाराने सामोरे जाण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी निरोपपर भाषणे सादर केली. अझफ कौचाली, जुवेरिया करबेलकर, जुवेरिया कालशेकर, अलमीरा चाफेकर, अरहान तांबे आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
*यावेळी विविध विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.*
👉 ‘बेस्ट बॉय’ पुरस्कार -
१. रय्यान रफीक तांबे (इ. १० वी)
२. अरहान रफीक तांबे (इ. १२ वी विज्ञान)
👉 ‘बेस्ट गर्ल’ पुरस्कार-
१. जुवैरिया फैज करबेलकर (इ. १० वी)
२. अलमीरा अल्ताफ चाफेकर (इ. १२ वी विज्ञान)
👉 ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार –
जुवेरिया जावेद कलशेकर (इ. १० वी)
इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी निरोपार्थ दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गुलाब, पेन आदी देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व समूह छायाचित्रण करण्यात आले. जान्हवी वैश्यंपायन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी भावूक करणारा असला, तरी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा व विश्वास निर्माण करणारा ठरला. यानंतर शाळेच्या वतीने दहावी, बारावीचे विद्यार्थी व सर्व शिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

No comments:
Post a Comment