देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचे घर फोडून चोरट्यांनी ७२ हजाराचा ऐवज पळवीला
दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत वरुड तांडा येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाची घर फोडून चोरट्यांनी ७२ हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. वरुड तांडा येथील गणेश राठोड हे त्यांच्या कुटुंबीयांसह तारीख सहा फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी हैदराबाद येथे गेले होते. यावेळी घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराच्या कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश केला त्यानंतर चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटाची कुलूप तोडून कपाटातील वीस हजार रुपये रोख व सोन्याचे सेवन पीस तसेच जगदंबा देवीची मूर्ती असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला.
दरम्यान राठोड कुटुंबीय देवदर्शनावरून आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येतात त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव, शिवाजी पवार, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याप्रकरणी गणेश राठोड यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे जमादार संतोष नागरगोजे पुढील तपास करीत आहेत

No comments:
Post a Comment