करमाळा येथील शिवस्मारक प्रतिष्ठानची श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व सुशोभिकरणसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी



करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे

  करमाळा नगर पालिका हद्दीमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व परिसरात सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकामासाठी ५० लाख निधी द्यावा’, अशी मागणी शिवस्मारक प्रतिष्ठाण व भाजप नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान तत्काळ निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री  गोरे यांनी या शिष्ठमंडळाला दिले आहे. यावर पालकमंत्री गोरे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली आहे. याशिवाय करमाळा शहरातील विविध विकास कामासाठी निधी कमीपडू दिला जाणार नाही असे आश्वासन भाजप नगरसेवकांना देण्यात आले आहे.

यावेळी करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,  नगरसेवक सचिन गायकवाड, अरुण जगताप, माजी नगरसेवक प्रविण जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,  बोरगावचे मा. सरपंच विनय ननवरे, करंजेचे मा. सरपंच काका सरडे, गणेश महाडिक, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment