देशमाने येथे कृषिदूतांतर्गत 'शून्य ऊर्जा शीतकक्ष' उभारणीचे प्रात्यक्षिक
प्रतिनिधी. = गणेश ठाकरे लासलगाव
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ,जगदंब एज्युकेशन सोसायटीच्या बाभुळगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी देशमाने गावात शून्य ऊर्जा शीतकक्ष उभारणीचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर केले.
कमी खर्चात भाजीपाला साठवणुकीचा मंत्रशेतकरी बांधवांना आपल्या शेतमालाची साठवणूक शास्त्रीय पद्धतीने करता यावी, यासाठी कृषिदूतांनी या शीतकक्षाचे महत्त्व पटवून दिले. गावात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून अत्यंत कमी खर्चात हे शीतकक्ष उभारता येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पालेभाज्या आणि फळभाज्यांचा साठवणूक कालावधी वाढतो.भाजीपाला बराच काळ टवटवीत आणि ताजा राहतो.बाष्पीभवनामुळे होणारी वजनातील घट कमी होते.फळे पिकण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे नुकसान टळते.
हे प्रात्यक्षिक कृषिदूत सुयश मुदगूल, अनिकेत निमसे, राकेश पवार, प्रज्वल थेरे आणि विशाल भवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. पी. कुळधर, उपप्राचार्य एस. डी. म्हस्के आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment