किड्स किंग्डम अकॅडमीत पत्रकार दिन साजरा व नूतन पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.

  



दर्पण न्यूज :(नेवासा प्रतिनिधी) नवनाथ घावटे.



सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये प्राचार्य किर्ती बंग यांच्या संकल्पनेतून पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी 'दर्पण' या नावाने मराठी मधील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत फटाले यांनी केले व आभार पल्लवी बेल्हेकर यांनी मानले व शाळेचे अध्यक्ष केदारनाथ बंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

 तसेच यावेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात दैनिक प्रभात चे पत्रकार रवींद्र शेटे यांचे अध्यक्षपदी, संतोष टेमक यांचे उपाध्यक्षपदी, तर सचिव पदी संदीप कुसळकर यांचे सर्वानुमते मते निवड करण्यात आली.

तर सदस्य पदी सुनील दरंदले, विनायक दरंदले, गणेश हापसे, संतोष टेमक, रवींद्र शेटे, नवनाथ घावटे, अशोक भुसारी, दिलीप शिंदे, मोहन शिंदे, मोहन शेगर,विजय खंडागळे,गणेश बेल्हेकर,बाळासाहेब दारकुंडे,किशोर दरंदले यांची निवड करण्यात आली.


No comments:

Post a Comment