घरकुलाचा हप्ता 31 डिसेंबर पर्यंत न दिल्यास ; प्रा शरदचंद्र डोंगरे यांचा उपोषणाचा इशारा
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
आवास योजनेंतर्गत घरकुलाचे पूर्ण बांधकाम करूनही शेवटचा ४० हजार रुपयांचा हप्ता न मिळाल्याने महागाव नगरपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांचा संयम संपला आहे. गत सात वर्षे प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने अखेर लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
प्रा. शरदचंद्र डोंगरे आणि प्रकाश नरवाडे यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करताना सांगितले की, घरकुल उभारण्यासाठी सोने-नाणे, शेतजमीन गहाण ठेवावी लागली, शेळ्या-मेंढ्या विकाव्या लागल्या, तरीही शासनाचा अधिकृत हप्ता अद्याप मिळालेला नाही. नगरपंचायत महागावने २०१८ व २०२५ मध्ये पत्रव्यवहार करूनही
प्रत्यक्षात लाभार्थ्यांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही. लाभार्थ्यांनी लोकशाहीदिनाच्या तीन अर्जांद्वारे, तसेच अमरावती आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करूनही नगरपंचायत, साहाय्यक आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाने एकही ठोस उत्तर दिले नाही, असा गंभीर आरोप

No comments:
Post a Comment