नजिक चिंचोली शाळेत पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड
प्रतिनिधी नामदेव सरोदे
नजिक चिंचोली येथे दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शाळेच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला पालक सभेच्या सुरुवातीलाच पालकांनी शिष्यवृत्ती परिक्षेस जिल्हायादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार केले .
त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष, श्री उमेश चावरे व उपाध्यक्ष श्री सचिन धाडगे यांची निवड प्रक्रिया लोकशाही,पारदर्शक, व एकमताने, नवे पदाअधिकारी निवडण्यात आले.माजी अध्यक्ष श्री महेश पाठक यांनी दोघांना ही शुभेच्छा दिल्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या मध्ये सर्व ग्रामस्थ, पालक यांनी मुख्याध्यापक श्री आरगडे सर यांच्या विनंतीस सकारत्मक होकार दर्शवत् सर्व वर्ग डिजीटल करण्याचे ठरले गेले . तसेच शाळेच्या पुढे 2000 Sq फुट लॉन कर लोकसहभागातून करण्याचे ठरले . व एक दिवस सर्वांनी शाळेत येऊन काम करण्याचा ठराव करण्यात आला श्री खंडागळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्या. श्री हरिभाऊ आरगडे सर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पालकांचे शाळेकडून आभार व्यक्त केले. यामध्ये उपस्थित भागचंद चावरे, ग्रामसेवक जाधव साहेब,सरपंच ज्ञानेश्वर चावरेउपसरपंच लक्ष्मण जाधवउमेश चावरे,योगेश पाठक,मुकुंद ठोंबरे नंदकुमार धाडगे,बाळासाहेब पाठक,जालिंदर धाडगे,कैलास चावरे,अशोक पाठक,विष्णु चावरे,सचिन धाडगे,अभय चौधरी ,दत्तात्रय पाठक,गणेश चावरे,सोमनाथ जाधव,संदिप पाठक,लक्ष्मण गाडे,संदिप आढागळे,रविंद्र नवले,मनोज ठोंबरे,सुरज तांबे,महेश पाठक,योगेश धाडगे,विनोद आढागळे,देविदास जाधव,प्रशांत आढागळे,सिताराम जाधव , बाबासाहेब सोनवणे,दादासाहेब पाठक,किरण आढागळे,रमेश पाठक,हुसेन सय्यद,संतोष पाठक,गोवर्धन,पाठक,पांडूरंग चावरे,ज्ञानदेव चावरे,बबन अहिरे असे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .

No comments:
Post a Comment