गोदावरी नदीवरील सुरेगाव नेवरगाव पुलाच्या
दर्पण न्यूज नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे
बऱ्याच दिवसा पासून अपेक्षित असलेल्या नेवरगाव सुरेगाव गंगा या गोदावरी नदीवरील पुलाच्या मागणीची परिपूर्णता पूल मंजूर झाल्यामुळे गोदावरी काठावरील सुरेगाव गंगा जैन पूर बेल गोदावरी काठावरील सुरेगाव गंगा जैनपूर बेल पांढरे गोधेगाव भालगाव परिसर आनंदित झाला आहे
या गोदावरी नदीवरील पुलाचा भूमिपूजन समारंभ उद्या
रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे. सुरेगाव गंगा, बेलपांढरी ता.नेवासा ते नेऊरगाव, ता. गंगापूर येथील *गोदावरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या सुरेगाव गंगा= नेवरगाव पुलाच्या भूमिपूजन समारंभ सद्गुरु आश्रमात गुरुवर्य बाबा ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे* रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे राज्याचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र), मा. सौ. शालिनीताई विखे पाटील (मा. अध्यक्षा, जि.प.अहिल्यानगर) यांच्या शुभहस्ते, सद्गुरु आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मा.खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील (अहिल्यानगर दक्षिण लोकसभा), मा. आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील(नेवासा), मा. आमदार श्री. रमेश बोरणारे सर(वैजापूर–गंगापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या बैठकी प्रसंगी बांधकाम विभागाचे श्री. विनायक पाटील साहेबांनी कामाची सविस्तर रूपरेषा विषद केली.कॉन्ट्रॅक्टर श्री.जगताप साहेबांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा पुल म्हणजे माऊलीं ज्ञानोबारायांची सेवा म्हणून उत्कृष्टच होईल असा विश्वासही व्यक्त केला. गुरुवर्य बाबा महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे या पुलाच्या कामात मोठे भरीव योगदान आहे वारकरी व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा पुल व्हावा असा शुभ संकल्प मनात आला. व त्यानुसार त्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला व खऱ्या अर्थाने यास मूर्त स्वरूप देण्याचे काम मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही यामध्ये विशेष योगदान लाभले. याप्रसंगी श्री.वालतुरे सर,श्री काकासाहेब शिंदे, श्री. प्रकाश सोनटक्के साहेब, श्री. सुनीलराव वाघ साहेब, सुरेगाव चे श्री काकासाहेब शिंदे पाटील संचालक ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, श्री. पाटील साहेब (सहा. कार्यकारी अभियंता, सा. बां. उपविभाग, नेवासा), श्री. जगताप तात्या (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), सामाजिक बांधकाम उप विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, नेवासा खुर्द, नेवासा फाटा, नेवासा बुद्रुक, सुरेगाव गंगा, बेलपांढरी, जैनपूर, बेलपिंपळगाव, भालगाव, उस्थळ खा, बहीरवाडी ता. नेवासा, नेऊरगाव, हैबतपूर,वाहेगाव, कानडगाव, बगडी, गाढे पिंपळगाव, ता.गंगापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी माहिती श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी दिली

No comments:
Post a Comment