पिंजऱ्यात जेरबंद बिबट्यास ठार करा मग घेऊन जा असा पवित्रा घेतल्याने नागरिक व विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

 



 प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा  नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू करून बाहेर घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे. या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे 

विद्यार्थ्यांनी वनविभाग व पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला असून जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

No comments:

Post a Comment