श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात विज्ञान कार्यशाळा
मांढळ - येथील श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात नुकतीच एकदिवस विज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा विभा सायन्स क्लब, विध्यार्थी विज्ञान मंथन यांचे संयुक्त विध्यमाने समानसंधी विभाग आणि रोटरॅक क्लब यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन पाणिनी तेलंग, गिरीश जोशी यांनी विज्ञानातील शोध, सकल्पना, शिक्षक विद्यार्थी संवाद, शिकविण्याचे तंत्र,शिक्षकांचीप्रयोगशिलता,देशपातळीवरील परीक्षा, यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी चैतन्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चक्रधर तितरमारे कार्याध्यक्ष चंद्रशेखर तितरमारे प्राचार्य डॉ.नवनीत कुमार लांबा, डॉ. स्मिता खरकाळे वसुंधरा साठे, माधुरी देहतकर, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता खारकाळे तर आभार प्रा. पंकज उके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment