श्री विश्वकर्मा सुतार सहकारी संस्था वरोराच्या अध्यक्षपदी श्री पदमाकर दुधलकर यांची निवड



वरोरा :- श्री विश्वकर्मा सुतार सहकारी संस्था वरोरा रजि.नं.१०४ ची  श्री २०२५ ची निवडणूक प्रक्रिया पार पडली व नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री पदमाकर दुधलकर यांची बिनविरोध निवड झाली.

   श्री विश्वकर्मा सुतार सहकारी संस्था वरोरा रजि.नं.१०४ संचालक मंडळाची निवडणूक २०२५ ते २०३० पर्यंत च्या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सर्वानुमते व एक मताने श्री पदमाकर जयराम दुधलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच खालीलप्रमाणे संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये लक्ष्मण रामभाऊजी धनवलकर, श्री पदमाकर जयराम दुधलकर, श्री गोपाळराव नामदेव बुरडकर, श्री केशव आत्माराम गहुकर, श्री प्रभाकर तुकाराम बुरडकर, श्री जनार्दन बालाजी गहुकर, जितेश अशोक कायरकर, श्रीमती प्रतिभा लक्ष्मण धनवलकर, श्रीमती माला नामदेव निमसटकर याप्रमाणे कार्यकारणी गठित करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये श्री.एस.पी.पाडे निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

     दि.१८/०५/२०२५ ला संचालक मंडाळाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडली. व दि. ६/०६/२०२५ ला निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली नवनिर्वाचित अध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी श्री विश्वकर्मा सुतार सहकारी संस्था वरोरा चे सभासद उपस्थित होते...

No comments:

Post a Comment