ब्रिटिशकालीन पूल झाले धोक्याचे
(शहापूर येथील पुल )
पूलाला पडले मोठे भगदाड?
पुलावरून जड वाहनाची वाहतूक सुरू?
काही अपघात घडल्यास याला कोण जिम्मेदार?
सार्वजनिक बांधकाम विभाग कि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
प्रविण भोंदे
भंडारा : शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील काही नजीकच्या अंतरावर असलेला वाकडा पुल नावाने प्रसिद्ध असलेल्या नाल्यावर दीडशे वर्षापूर्वी बनविलेल्या ब्रिटिशकालीन जुना राष्ट्रीय महामार्गाचे पुल जीर्णवस्थेत दिसून येत आहे पुला लगत मोठे खड्डे पडलेले आहे परंतु त्या पुलावरून मोटमोठया वाहनांची वर्दळ दिसून येत आहे
पुलाचे दोन्ही बाजूचे दुभाजाक सुद्धा नाल्यात कोसळले आहे परंतु त्या पुलावरून नागरिकांचे येणे जाणे सुरु आहे पूला लगत पुलाची एक बाजू मोठ्या प्रमाणात खचली आहे नागरिकांसाठी हे पुल धोक्याचे झाले आहे
त्या पुलावरून शहापूर वरून नांदोरा, ठाणा (पेट्रोल पंप) व अशा काही गावाचा संपर्क येतो आहे, परंतु याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कुणाचेही लक्ष नसून त्याकडे दुर्लक्ष होत आहे
सबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे ती नाकारता येत नाही, अशी भयावह परिस्थिती असून प्रशासन व लोकप्रतिनिधी सुद्धा गडद झोपेत आहे
संबंधित प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment