ग्रामीण भागातील असूनही परिक्रमा तंत्रनिकेतनसाठी विद्यार्थी तरुणांची पसंती.



प्रतिनिधी: प्रा.अशोक राहिंज 

      मा.श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचे परिक्रमा पॉलीटेक्निक महाविद्यालय गुणवत्ता व शिस्तप्रिय म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण केलेले महाविद्यालय असून संस्थेचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आ.विक्रमसिंह पाचपुते, मुख्य का.अधिकारी ॲड.प्रतापसिंह पाचपुते,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.अनिल पुंड सर प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिटेक्निक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच्या निर्णयाखाली असलेली प्रशस्त इमारत, डिजिटल क्लासरूम उच्चशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग असून विद्यार्थ्यांनच्या सर्वांगीण विकास व शैक्षणिक विकासावर भर देणे हा मुख हेतू आहे.

     तीन वर्षाचा अभ्यासक्रमा मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनियरिंग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजीनिअरिंग या शाखा मध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

      गुणवत्ता आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांमुळे अनेक कंपन्यांना महाविद्यालयाची भुरळ पडली. आणि बजाज ऑटो,केएसपीजी ऑटोमोटिव्ह प्रा.लि.पुणे.,रिलायबल टेक्निकल सर्व्हिसेस प्रा. लि.,थॅलमस व्हेंट्रेस प्रा.लि.पुणे,पॅरामाउंट पॉलिमर प्रा.लि.,बजाज पॉवर इक्विपमेंट प्रा. लि.,ओमश्रीराम स्टील अँड अलॉय प्रा.लि.ग्लोबल एज्युटेक प्रा.लि.पुणे.

यासारख्या मल्टीनॅशनल नामांकित कंपन्यांमध्ये महाविद्यालयातील एकूण 210 विद्यार्थ्यांची निवड झाली.

      पारस सारख्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट आणि पोस्टर सादरीकरण घेतला जातो, यामध्ये राज्यातून विविध महाविद्यालय सहभागी होत असतात. व तसेच इतर महाविद्यालयीन आयोजित करत असलेल्या राज्यस्तरीय पोस्टर आणि प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये परिक्रमा पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सहभागी होत असतात.यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

      तसेच दरवर्षी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन द्वारे घेण्यात येणाऱ्या विभागीय व राज्यस्तरीय विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. चालू वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये100 मीटर व 200 मीटर यामध्ये प्रथम क्रमांक व उंच उडी या खेळामध्ये सहभाग आणि टेबल टेनिस आणि कॅरम या खेळामध्ये विभागीय द्वितीय क्रमांक अशी उल्लेखनीय कामगिरी पाहण्यास मिळाली.

        आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की *परिक्रमा पॉलिटेक्निकला व्हर्च्युअल लॅब्स* उपक्रमासाठी नोडल सेंटर म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे, हा एक प्रतिष्ठित प्रकल्प आहे जो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आयसीटीद्वारे शिक्षणावरील राष्ट्रीय अभियान (एनएमईआयसीटी) अंतर्गत चालवला आहे.शिक्षणातील डिजिटल शिक्षण आणि नवोपक्रमासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून, *आमच्या कॉलेजने देशभरातील सर्व २६६ नोडल केंद्रांमध्ये २२ वा अखिल भारतीय क्रमांक मिळवला आहे.*

     परिक्रमा तंत्रनिकेतन मध्ये यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे जानेवारी ते मार्च 2025 मध्ये झालेल्या नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स लर्निंग (IIT मद्रास)NPTEL यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन मधील सर्व विभागातील शिक्षक व एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 75 हुन अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रमाणपत्र मिळाले.

     वरील सर्व गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे परिक्रमा तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेणे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न बनले आहे. 


No comments:

Post a Comment