संगीता तुराई यांचा वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नतीनंतर सत्कार

 



मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी


ठाणे: ठाणे महानगरपालिकेत लिपिक टंकलेखन पदावर कार्यरत असलेल्या संगीता तानाजी तुराई यांची वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा आज सन्मान करण्यात आला. सहाय्यक शिधावाटप  अधिकारी सौ. रूपाली वाघमोडे, मुंबई विभाग संपर्क प्रमुख व जिल्हाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ) श्री. प्रमोद वाघमोडे, तसेच कनिका वाघमोडे व माहिरा वाघमोडे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सत्कार व अभिनंदन केले.

संगीता तुराई यांचा परिवार शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीतही यशस्वी आहे. त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश तुराई फिजिओथेरपिस्ट असून, धाकटा मुलगा स्वप्निल तुराई आयटी इंजिनिअर आहे. संगीता तुराई यांच्या पदोन्नतीमुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment