शिरूर बसस्थानकातील समस्यांवर ‘खड्ड्यात झोपून’ आंदोलन...! सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांचा अनोखा निषेध; प्रशासनासमोर ठोस आश्वासनांची यादी..!



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


शिरूर बसस्थानकातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधा, खराब व्यवस्थापन, अनियमित सेवा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक आगळंवेगळं आंदोलन करत जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आंदोलन सुरू केले, ज्यामुळे हे आंदोलन सोशल मीडियावर आणि शहरभर चर्चेचा विषय ठरले.

पूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा निषेध

या आधीही प्रितेश फुलडाळे यांनी बसस्थानकाच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड, स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी, तसेच स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

त्या बैठकीत पुढील आश्वासने दिली गेली होती.

१० दिवसांत समस्यांचे निवारण*

पुढील महिन्यात शिरूर आगाराला १० नवीन बसेस

मात्र, कोणतीही ठोस कृती न झाल्याने संतप्त होत फुलडाळे यांनी पुन्हा आंदोलन छेडले.

नवीन आंदोलनानंतर प्रशासनाची बैठक व ताज्या आश्वासनांची यादी

प्रशासनाने पुन्हा एकदा आंदोलकांशी चर्चा करत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले:

प्रमुख निर्णय व आश्वासने –

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाजवळ असलेली पिण्याच्या पाण्याची जागा बदलून नवीन ठिकाणी RO प्लांट बसवण्यात येणार असून हे काम महिनाभरात पूर्ण होईल.

बसस्थानकातील आतील रस्त्याची दुरुस्ती –

पुढील दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार.

शिरूर आगारासाठी नवीन बसेस –

लवकरच ५ नवीन बसेस शिरूर आगारात दाखल केल्या जातील.

बस मार्गात बदल –

पुणे–अहिल्यानगर बाह्यमार्गाऐवजी थेट शिरूर बसस्थानकातून बस ये-जा करतील. याबाबत लवकरच सूचना दिल्या जातील.

पोलीस बंदोबस्त –

बसस्थानक परिसरातील सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यासंबंधी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.

खाजगी वाहन पार्किंगवर कारवाई –

स्थानकात होणाऱ्या अनधिकृत खाजगी वाहन पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना दिल्या जातील.

कचरा व्यवस्थापन बसस्थानकातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार.

पाण्याच्या बाटल्यांचे दरफलक –

स्थानकात मिळणाऱ्या “नाथजल” पाण्याच्या बाटल्यांचा दर ₹१५ असलेला फलक लावण्यात येईल.

प्रवेशद्वार व गार्डनजवळ लाईट –

प्रवेशद्वाराजवळ लाईट बसवण्यात येणार, जेणेकरून रात्री अंधाराची समस्या दूर होईल.

CNG पंपाबाबत माहिती –

आगारातील CNG पंपाच्या प्रगतीची माहिती अधिकृतरित्या देण्यात येणार.

ग्रामीण भागातील एस.टी.साठी स्वतंत्र फलाट ही मागणी प्रशासनाने मान्य केली. असून त्यासाठी आवश्यक तयारी केली जाणार आहे.

आंदोलनात विविध पक्ष व संघटनांचा सक्रीय सहभाग

या आंदोलनात प्रितेश फुलडाळे यांच्यासोबत अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी, अनिल बांडे, ॲड.सुभाष जैन, ॲड.रवींद्र खांडरे , प्रिया बिरादार, विजय नरके,, राजेंद्र शहाणे, रणदिवे मामा, डॉ. वैशाली साखरे, अविनाश घोगरे, राजेंद्र महाजन, शंकर चाबुकस्वार, सोहेल शेख, शांतीलाल नहार, बाळासाहेब तातेड, अशोक गुळादे, सावळेराम आवारी,सविता बोरुडे, कोमल भणगे, हीना शेख, प्रीती बनसोडे, सुधीर कडेकर

शिरूरकरांची मागणी – आश्वासन नाही, अंमलबजावणी हवी!

या आंदोलनामुळे प्रशासन हलले असले, तरी हे आश्वासन केवळ कागदापुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे, अशी जनतेची ठाम मागणी आहे. शिरूरकरांना आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष बदल हवा आहे.

प्रितेश फुलडाळे यांनी केलेले हे अनोखे आंदोलन आणि विविध पक्ष-संघटनांचा मिळालेला पाठिंबा प्रशासनाच्या झोपेचं भान ठेवलं आहे. यानिमित्ताने शिरूर बसस्थानकाच्या समस्यांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहिलं जातंय. पुढील काळात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरतात का, याकडे शिरूरवासियांचे बारकाईने लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment