अटकळी येथे बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथे दिनांक 30 रोजी बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला हार टाकून विनम्र अभिवादन करण्यात आले.
बसवेश्वर जयंती ही १२व्या शतकातील महान संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाते. त्यांनी अनुभव मंटप नावाचे एक प्रकारचे लोकशाही व्यासपीठ तयार केले, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन चर्चा करीत. लिंगायत धर्माची स्थापना त्यांच्या विचारसरणीतून झाली.सत्य, अहिंसा आणि समानतेचा मार्ग दाखवणाऱ्या महान संत श्री बसवेश्वर यांना कोटी कोटी प्रणाम! बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांना समानतेचा संदेश देणारे, कर्मयोगाचे महत्त्व सांगणारे संत बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले जयंती साजरी करताना गावातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील डोंगरे , उपसरपंच रणवीर डोंगरे, संग्राम डोंगरे बसवेश्वर खेंगटे, ओमकार स्वामी, ओमेश बोंगाळे, दत्तू पाटील बोंगाळे, संभाजी जाधव, मोहन जाधव, बालाजी डोंगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment