परिक्रमा तंत्रनिकेतन मधील शिक्षक व विद्यार्थ्यांना NPTEL (IIT मद्रास) परीक्षेचे पंचाहत्तरहून अधिक प्रमाणपत्र प्राप्त.
श्रीगोंदा प्रतिनिधी: प्रा.अशोक राहिंज
जानेवारी ते मार्च 2025 मध्ये झालेल्या नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स लर्निंग (NPTEL (IIT मद्रास)) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन मधील सर्व विभागातील शिक्षक व एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या समजले जाणाऱ्या या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रथमच सहभाग होऊन एकूण पंचाहत्तरहून अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रमाणपत्र मिळाले.
यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थी कु.पंकज येडे Elite Silver मानांकन मिळाले व कॉम्प्युटर विभागातील कु.ओम दत्ता पवार ,कु. वैष्णवी विजय भोंडवे, कु. प्रियंका शहाजी कचरे, कु. आरती गणेश निक्षे,कु.आदेश अमोल उदमले या विद्यार्थ्यांना Elite मानांकन मिळाले. व बाकी विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य प्रमाणपत्र मिळाले.विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा फायदा भविष्यामध्ये करिअर घडवण्यास नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
या यशासाठीश्री बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री श्री. बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव मा.श्री. आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर मा.सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पुंड सर, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, प्राचार्य डॉ. मोहन धगाटे सर, प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ सर, प्राचार्य डॉ. सुदर्शन गिरमकर सर प्राचार्य डॉ. पी.ए. इथापे सर, व प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी व समन्वयक प्रा. बेदरे सिताराम व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयीन या घवघवीत यश बद्दल सर्व कर्मचाऱ्यांमध्ये व विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
No comments:
Post a Comment