अनैतिक संबंधांच्या वादातून भरदिवसा तरुणाची चाकूने भोसकून हत्या



दर्पण न्यूज (अहिल्यानगर प्रतिनिधी) : घावटे नवनाथ (दि.13/11/26)

अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई ता. नेवासा येथील डॉ. आंबेडकर चौकात शिंगणापूर कमानीजवळ शुक्रवारी (दि. १३) सकाळी ११:४० वाजता रावसाहेब मच्छिंद्र पंडित (वय ४०) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. मालवाहतूक गाडी चालवणारे रावसाहेब पंडित यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तिच्या मुलाने वारंवार समज देऊनही हे अनैतिक संबंध सुरूच असल्याने संतापून ही हत्या करण्यात आली. 

घटनेच्या वेळी पंडित आपल्या गाडीजवळ उभे असताना संबंधित महिलेचा मुलगा आणि त्याच्या अनोळखी साथीदाराने दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले व ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.


No comments:

Post a Comment