शेत रस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात 'जन न्याय दिन' उत्साहात; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन


शेवगाव (प्रतिनिधी):
 

शेत रस्ता पीडित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शेवगाव तहसील कार्यालयात 'जन न्याय दिन' आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणंद रस्ता चळवळीचे प्रणेते श्री. शरदभाऊ पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य उपाध्यक्ष श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

यावेळी माननीय तहसीलदार श्री. आकाश दहाडदे साहेब यांनी चळवळीतील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि शेत रस्त्यांच्या अडचणींची अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेतली. यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी असाच 'जन न्याय दिन' दर महिन्यातून एक दिवस नियमितपणे घेण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी केली. तहसीलदार श्री. दहाडदे साहेब यांनी या मागणीला सकारात्मक मान्यता देत, यापुढे दर महिन्याला निश्चितपणे जन न्याय दिन आयोजित केला जाईल, असे ठोस आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

या बैठकीत श्री. पोपट हरदास, कल्याण जगदाळे सर, आबासाहेब जायगुडे, सुभाष आव्हाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या रस्ताविषयक प्रश्नांवर सविस्तर व साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी चळवळीचे नेवासा येथील पदाधिकारी श्री. रमेश भक्त, सुभाष आव्हाड, श्री. बाळासाहेब थोरातराज्य समन्वयक, विठ्ठल निर्मळ आशाताई वाघ,सोमनाथ तोडमल, अ‍ॅड. बुधवंत वकील, सदाशिव नवघरे सर आणि राज्य उपाध्यक्ष श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कल्याण जगदाळे सर यांनी सर्व उपस्थितांचे व प्रशासनाचे आभार मानले


No comments:

Post a Comment