रुई-बाबीर यात्रेत गजढोल नृत्याचा जिवंत वारसा
;अमोल भिसेंच्या पुढाकाराने गजढोल नृत्याला नवजीवन ,अनेक मान्यवरांची स्पर्धेला उपस्थिती
इंदापूर प्रतिनिधी:- अंकुश भोसले
रुई (ता. इंदापूर), दि. ११ रोजी: इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित गजढोल नृत्य स्पर्धेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन पारंपरिक लोककलेला मोठा उत्साह दिला. यावेळी त्यांनी स्पर्धकांचे उत्साहाने स्वागत केले तसेच गजढोल नृत्यासारख्या पारंपरिक कलेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
रुई येथील श्री बाबीर देवाची यात्रा ही धनगर समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असून दरवर्षी या यात्रेनिमित्त गजढोल नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत लहान मुले-मुलींसह विविध वयोगटातील कलावंत सहभागी होतात. गजे आणि ढोलाच्या तालावर झालेल्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
पारंपरिक कलेला नवजीवन
अखंडित गेल्या २६ वर्षांपासून चालू ठेवत, लोप पावत चाललेल्या गजढोल नृत्याला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम मा. अमोल भिसे यांनी केले आहे. त्यांच्या पुढाकारातून दरवर्षी बाबीर यात्रेनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामुळे धनगर समाजाची ही प्राचीन लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते आहे.
गजढोल नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून धनगर समाजाची श्रद्धा, एकता, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे माध्यम आहे. या स्पर्धेमुळे गावातील तरुण पिढीला पारंपरिक कलेशी जोडले जाते तसेच यात्रेला अधिक आकर्षण प्राप्त होते.
कार्यक्रमाचे वातावरण
स्पर्धेच्या वेळी गजे आणि ढोलाच्या गजरात परिसर दंगल उडाला. स्पर्धकांनी विविध तालांवर शिस्तबद्ध आणि उत्साही सादरीकरण केले. पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनीही स्पर्धकांना उत्साहाने पाठिंबा दिला.प्राचार्य मा.राम शिंदे, कृषिमंत्री मा.दत्तात्रय (मामा) भरणे, माजी मंत्री.हर्षवर्धन पाटील, कर्जत -जामखेड आमदार मा. रोहित दादा पवार,प्रवीण भैया माने यांनीही उपस्थिती लावली गजढोल स्पर्धेला गळ्यात गजढोल बांधून वाजवण्याचा आनंद सर्व नेत्यांनी घेतला...
यांनी आयोजक अमोल भिसे यांचे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे अभिनंदन केले. पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांना सतत पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.
स्थानिकांचा आनंद
रुई-बाबीर नगरीत यात्रेचे वातावरण भक्तिमय असून गजढोल नृत्य स्पर्धेने उत्सवाला अधिक भक्कमपणा प्राप्त झाला. अमोल भिसे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे आयोजित केली जात असल्याने स्थानिकांमध्ये ती विशेष आवडीने पाहिली जाते

No comments:
Post a Comment