श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

सालतवाडा (ता. मूर्तिजापूर) : आद्यक्रांतिकारक, क्रांतीगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या 232 व्या  जयंती निमित्त श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा यांच्या वतीने कर्मयोगी गाडगे महाराज चौक येथे प्रेरणादायी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवर, युवक, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गावंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच राजू वानखडे उपस्थित होते. यावेळी भास्कर चहाकार , अमोल नागे, मनीष गावंडे, अंकुश नागे, योगेश वानखडे, गजानन गावंडे, शिवम अरज, गजानन सुरजुसे, रुपेश गावंडे, शिवा तवर, जयेश वानखडे, अमोल सहारे यांच्यासह गावातील अनेक नागरिक, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि देशभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन युवकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश या अभिवादन कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आकाश वानखडे, सूरज वानखडे आणि श्रेयश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूरज गावंडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment