श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडाच्या वतीने साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभीवादन.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा येथे लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने कर्मयोगी गाडगे महाराज चौकात अभिवादनाचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, युवक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले. "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे" हा त्यांचा विज्ञानवादी आणि श्रमिकांचा सन्मान करणारा विचार आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक दादाराव वानखडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सीताबाई वानखडे हे होते. यावेळी गजानन वानखडे,नितीन तवर, भिमराव वानखडे,प्रकाश वानखडे, संकेत शेंद्रे,शंतनू वानखडे,नैतिक नेमाडे,सम्यक तायडे, तेजस वानखडे,गौरव वानखेडे,यश वानखेडे, नैतिक राऊत,गोपाल सुरजुसे,गबरू वानखडे, दादू सुरजुसे, श्रेयश चव्हाण यांच्यासह गावातील अनेक नागरिक व युवक उपस्थित होते.
उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या समतेच्या, बंधुतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन चव्हाण यांनी मा

No comments:
Post a Comment