कळमनुरीत बी.ए.च्या विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील प्रविण विश्वनाथ खुडे (वय २१) या बी.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह कळमनुरी शहराजवळ उमरा पाटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत एका शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात उडाली प्रविण हा समर्थ महाविद्यालय, हिंगोली येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी तो घरातून "कॉलेजला जात आहे" असे सांगून निघाला होता. मात्र, काही वेळाने त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जमीर नाईक, पोलीस हवालदार दिलीप पोले तसेच गुंजकर, जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, ही आत्महत्या नसून प्रविणचा घातपात करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी सांगितले की, "शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास सुरू असून, नातेवाईकांनी केलेला घातपाताचा आरोप हा त्यांचा दावा आहे. अधिकृतरीत्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टम अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल."

No comments:
Post a Comment