'म्हसळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदीन उत्साहात साजरा'



 .वैभव कळस

दिनांक १९ जून २०२६ रोजी शिवसेना ६० वा वर्धापनदिन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुह्दयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करून तसेच शिवसेना ६० व्या वर्धापनदिनानिमित्त स्व बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी तसेच त्यांचा यथोचित सन्मान करून साजरा करण्यात आला.शिवसेना' आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला संस्कार, विचार, आचार आहे.   

आज जो काही मान, सन्मान,  सामाजिक, राजकिय ओळख, प्रतिष्ठा मिळतेयं ती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेचं.!त्यामुळे यापुढेही जिवात जीव असेपर्यंत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहायचा निर्धार वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांकडून करण्यात आला.त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, तालुकाप्रमुख तुकाराम चाळके, शहर प्रमुख अभय कळमकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, उपतालुका प्रमुख राजाराम तीलटकर,दीपल शिर्के, अंकुश नटे, मोहन शिंदे, नजीर कादरी आणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  


No comments:

Post a Comment