गणेश राऊत आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

 



प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे मेहकर.                  

मेहकर : -  आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागळातील जनसामान्य लोकांना  न्याय देणारे , विधायक पत्रकारिता करणारे गणेश राऊत यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .    पत्रकार उत्कर्ष समिती  च्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन  समाजातील विविध क्षेत्रातील कतुत्ववान व्यक्तीचा पुरस्कार सोहळा मोठ्या  उत्साहात आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके नाटयगुह पनवेल  येथे संपन्न झाला .     

  या वेळी पनवेल महानगर पालिकेच्या महिला व बाल कल्यान सभापती ममता  म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व  पत्रकार उत्कर्ष समिती महिला प्रदेश अध्यक्ष स्मिता पाटील , उपाध्यक्षा आरती पाटील , सचिव ॲड .दिव्या लोकरे , शिवसेना शिंदे गटाचे नेते परेश पाटील , महानगपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, डॉ अशोक म्हात्रे, डॉ वैभव पाटील व पत्रकार उत्कर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी    यांची प्रमुख उपस्थिती होती .                 

गणेश राऊत हे मागील पंधरा वर्षापासुन सकारात्मक पत्रकारिता करत असून त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये  काम केले आहे.विविध वृत्तपत्रातून त्यांचे लेखही प्रकाशित होतात . त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या आधी ग्रामगीता साहित्य पुरस्कार , राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार , प्रबोधकार संत नामदेव पुरस्कार , समाजरत्न पुरस्कार , उत्कृष्ट वृत्तसंपादनाचा दै विश्वजगत चा पुरस्कार ,बुलढाणा सुतार समाज एकिकरण समिती , रचियता साहित्य संघ नागपुर, साहित्य जगत मासिक यांनी सन्मानित करण्यात आले आहे . त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल त्यांचे सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे . मिळालेल्या पुरस्काराचे क्षेय तेआई - वडील , पत्रकारितेतील मार्गदर्शक, मित्र यांना देतात.

No comments:

Post a Comment