उजनी धरणाचे निर्माते देशभक्त मा. आ. नामदेवराव जगताप यांचेच नाव धरणाला द्या; धुळा भाऊ कोकरे यांची मागणी
सोलापूर, पुणे जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे उभे राहिले, त्या देशभक्त माजी आमदार नामदेवरावजी जगताप यांचे नाव या धरणाला देण्यात यावे, अशी मागणी धुळा भाऊ कोकरे यांनी केली आहे.
'जगताप साहेबांच्या कष्टाचे फळ म्हणजे उजनी धरणाच्या इतिहासाला उजाळा दिणे. ते म्हणाले की, "उजनी धरणाची निर्मिती ही केवळ एक सरकारी प्रकल्प नव्हता, तर ते देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या अथक परिश्रमाचे आणि संघर्षाचे फळ आहे. आमदार असताना त्यांनी या धरणासाठी जो पाठपुरावा केला, त्यामुळेच आज हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ज्यांनी हे धरण बांधले, त्यांचेच नाव या प्रकल्पाला मिळणे हा त्यांचा खरा अधिकार आहे."
उजनी धरण बांधण्यात नामदेवराव जगताप यांचा सिंहाचा वाटा असल्याने, कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव धरणाला देणे गरजेचे आहे. जगताप साहेबांच्या कार्याची ओळख हि येणाऱ्या पिढीला व्हावी काळाची गरज आहे. यासाठी हा नामकरणाचा निर्णय ऐतिहासिक ठरेल.
या भागातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेची ही जुनी इच्छा असून, सरकारने आता विलंब न करता ही मागणी मान्य करावी. हाच खरा न्याय आहे," असे ठाम मत धुळा भाऊ कोकरे यांनी व्यक्त केले आहे.

No comments:
Post a Comment