महिन्यांत 42 सांधेरोपण तर 300 अधिक शस्त्रक्रिया यशस्वी शासकीय योजनांमुळे गरिबांना मिळाले मोफत उपचार
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
आरोग्य सेवा क्षेत्रात हिंगोली जिल्ह्याचे नाव उंचावत उर्मिला हॉस्पिटल प्रा. लि. ने एक मोठा टप्पा गाठला आहे. मागील केवळ ८ महिन्यांच्या कालावधीत या रुग्णालयात ४२ यशस्वी सांधेरोपण आणि ३०० पेक्षा अधिक इतर महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पूर्ण करून रुग्णसेवेचा नवा आदर्श निर्माणकेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नाही.गरिब्रांसाठी 'वरदान' ठरल्या शासकीय योजना अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे रुग्ण सांधेरोपण किंवा मोठ्या शस्त्रक्रिया करणे टाळतात. मात्र, उर्मिला हॉस्पिटलने केंद्र आणि राज्य सरकारच्याआरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्ययोजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर मोफत आणि कॅशलेस उपचार करण्यात आले आहेत. तसेच, गंभीर प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतूनही आर्थिक मदत मिळवून देण्यात हॉस्पिटलने पुढाकार घेतलाआहे. हिंगोलीतच मिळतायत अत्याधुनिक्क सुविधा गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा अपघातातील
गंभीर दुखापतींवर उपचारांसाठी पूर्वी नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागायचे.मात्र, उर्मिला हॉस्पिटलने सांधेरोपणासोबतच जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया हिंगोलीतच उपलब्ध करून दिल्या आहेत. हायवेवर असलेले हे रुग्णालय अपघातातील रुग्णांसाठी गोल्डन आवर मध्ये उपचार देऊन जीव वाचवण्यात यशस्वी ठरत आहे असे डॉ. दिलीप मस्के नाईक यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment