वंचित चे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा जाहीर निषेध.
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात बसलेले असताना तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर चाकू आणि बंदूक घेऊन जीव घेण्याच्या पूर्ण तयारीत आले होते. राजू कांबळे यांनी हल्ल्याचा प्रतिकार केला, त्यामुळे ते बचावले आहेत.
शस्त्रधारी आरोपी कार मध्ये बसून आले होते. अशा प्रकारे चाकू व बंदूक घेऊन जीव घेण्याचा कट रचून हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करून यामागील षडयंत्र रचणारे कोण आहेत, याचा खुलासा पोलिसांनी करवा अशी मागणी करण्यात आली
वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असे या वेळी वंचित बहुजन आघाडीचे ॲड बौद्धरतन बलखंडे यांनी सांगितले

No comments:
Post a Comment