वित्तीय साक्षरता सप्ताह निमित्त फिनाक्सेस संस्थेच्या वतीने कॅम्पचे आयोजन संपन्न
प्रतिनिधी मुकुंद सुकटे
दिनांक 11-2-2026 रोजी सांगली ज़िल्हातील काकाची वाडी येथे वित्तीय साक्षरता सप्ताह निमित्ताने स्वाधार फिनाक्सेस या संस्थेच्या वतीने केवायसी व विविध शासकीय योजनांचा कॅम्प आयोजित करण्यात आला सदर कॅम्प मध्ये बँक केवायसी जीवन ज्योती विमा योजना जीवन सुरक्षा विमा योजना सुकन्या समृद्धी योजना या योजनांचा कॅम्प हनुमान मंदिर काकाची वाडी येथे आयोजित करण्यात आला सदर कॅम्प साठी जिल्हा ग्रामीण बँकेचे श्री दीपक क्षीरसागर सर जिल्हा मध्यवर्ती बँक बागणी ब्रांच मॅनेजर राजश्री पाटील मॅडम तसेच उमेद अभियान सी आर पी ताई मॅडम तसेच कृषी सखी जाधव मॅडम उपस्थित होत्या. क्षीरसागर सरांनी महिलांना खूप चांगलं मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच केवायसी संदर्भात मार्गदर्शन करून प्रोजेक्टर वरती केवायसी संदर्भातील चित्रफिती प्रदर्शित करण्यात आल्या सदर कॅम्पला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रोडकलिंकेजेस तसेच केवायसी लोकांच्या करून घेण्यात आल्या.स्वाधार संस्था चे योगेश सर कैलास सर व पूनम मॅडम तसेच काकाची वाडी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment