सहकार विद्या मंदिर बिबी शंभर टक्के निकाल
प्रतिनिधी - अशोक ढाकणे (सिंदखेड राजा)
दिनांक - 14 मे रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये सहकार विद्या मंदिर बिबी शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला असून शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी अंतर्गत संचालित सहकार विद्या मंदिर बिबी शाळेत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये 109 विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. राज सुरेश खंदारे व कुमारी तनुश्री महेश हजबे या विद्यार्थ्यांनी 96 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कुमारी सुवर्णा अंकुश सोळंके हिने 95.20% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर आकांक्षा विजय देशमुख हिने 94.20% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला तर कुमारी अनुष्का आघाव हिने 94%, कुमारी स्वरा खेडकर 92.80%, युवराज गरकळ 92.80%, कुमारी श्रुती भानुसे 92.5, शिवांग नागरे 92%, कुमारी प्रांजली दानवे 91.5 ,कुमारी अनुष्का सातपुते 91.20 %, नमन महाजन 91.20%, कुमारी प्रतीक्षा जायभाये 91 %, कुमारी अनुष्का देशमुख ९०.४०, कुमारी अक्षरा खारडे ९०.२०% कुमारी पल्लवी तारे 90.20% योगेश बारहाते 90% तर ओम जायभाये 90% गुण केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्यामजी चांडक, अध्यक्ष बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी डॉक्टर श्री सुकेशजी झंवर , अध्यक्षा सौ कोमल झंवर, मुख्याध्यापक इंगळेसर सह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
No comments:
Post a Comment