दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन
.
हडपसर,वार्ताहर. प्रतिनिधी अनिल वाव्हळ-
हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील 659 पैकी 654 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल 99.24 % लागला. विद्यालयातील तब्बल 49 विद्यार्थ्यानी 90 % पेक्षा जास्त गुण मिळवले. विशेष प्राविण्य 213 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 218 विद्यार्थी,द्वितीय श्रेणी 172 विद्यार्थी,तर तृतीय श्रेणी 51 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. विद्यालयातील जाधव ओम,हिंगे ओम,शहाणे कृष्णा व डोळे चैतन्य या 4 विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले तर नरके ओंकार या विद्यार्थ्याने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.तर परदेशी श्रीपाद या विद्यार्थ्याने टेक्निकल विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक नरके ओंकार सखाराम 98.60 % ,द्वितीय क्रमांक जाधव ओम विठ्ठल 98.20 % ,तृतीय क्रमांक चिंचोलकर सोहम तुळशीराम,बेंडसुरे आयुष संजय 97.60 %
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे,पर्यवेक्षक अजय धनवडे,सर्व विषयशिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन,आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी संजय मोहिते,सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी
अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment