'सामाजिक व आर्थिक विकासात म्हसळा कुणबी सहकारी पतसंस्थेचा मोलाचा वाटा '- चेअरमन महादेव पाटील
(वैभव कळस )
म्हसळा येथील कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सहकार क्षेत्रात विश्वासार्हता जपत सभासद,ठेवीदार आणि ग्राहकांच्या सहकार्याने संस्थेने केलेली प्रगती ही कौतुकास्पद असून सामाजिक व आर्थिक विकास साधण्यात संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन महादेव भिकू पाटील यांनी केले.या वेळी चेअरमन महादेव पाटील,व्हाईस चेअरमन दिलीप मांडवकर,संचालक मंडळ व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
सोहळ्याला कुणबी समाजाचे नेते तथा पंचायत समिती सभापती बबन मनवे,पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले,सदस्या प्रियंका निंबरे,जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत,अभिषेक विचारे,समाजसेवक समीर बनकर, मधूकर गायकर,शेखर खोत,पोलीस उपविभागीय अधिकारी योगिता कुटे,आरडीसी बँकेचे अधिकारी विजय पयर,विनोद धोकटे,निलेश मांदाडकर,किरण पालांडे,रमेश पोटले आणि श्रीकांत बिराडकर यांची विशेष उपस्थिती होती.मान्यवरांनी संस्था भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी चेअरमन महादेव पाटील यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत भावी विकास योजनांची माहिती उपस्थित मान्यवरांसमोर मांडली.सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून संस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आर्थिक व्यवहारांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचे कार्य संस्था करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
२८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्व सभासद,ठेवीदार, ग्राहक,संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले.आगामी काळातही संस्थेची प्रगती साधत सहकार क्षेत्रातील विश्वास अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.मान्यवरांच्या शुभेच्छा आणि उत्साही वातावरणात वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.

No comments:
Post a Comment