जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गणेश राऊत सन्मानित

 



    प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी                 

  मेहकर : लोणार वन्यजीव अभयारण्यातील लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरील पाणथळ क्षेत्र असून लोणार सरोवर व परिसर कचरामुक्त ठेवण्याकरिता वेळोवेळी या विभागासोबत उपक्रम राबवुन लोणार सरोवराच्या जतन , संरक्षण व संवर्धनामध्ये सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ . प्रविण देवरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .  ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने "मी लोणारकर टीम " व इतर संस्थेच्या वतीने आयोजीत क्लीन लोणार ,ग्रीन लोणार या अभियानानिमित्य आयोजीत वृक्षारोपन व स्वच्छता अभियान निमित्त पर्यटक सुविधा केंद्र लोणार येथे आयोजित कार्यक्रमात गणेश राऊत सह शरद वानखेडे , रफिक कुरेशी व मी लोणारकर टिमच्या सर्व सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ . प्रविण देवरे यांच्या शुभहस्ते व वन विभागीय अधिकारी यशवंत नागुलवार , उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी , प्रशात सानप , तहसिलदार भुषण पाटील , मुख्याधिकारी विभा वराडे, ठाणेदार प्रकाश सदगीर , तालुका कृषी अधिकारी रविराज सीदोरे, प्रकाश मापारी , बळीराम मापारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी वन्यजीव रक्षण सचिन कापुरे यांनी माझी वसुंधरा अभियानाविषयी शपथ दिली या वेळी जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले . कार्यक्रम यशस्वीते साठी लोणारकर टिमच्या सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . गजानन खरात यांनी तर प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले .


No comments:

Post a Comment